पुण्यात गव्याचा मृत्यू झाल्याची घटना ताजी असतानाच पिंपळे गुरव यथे घडलेल्या या घटनेवरून विकृती प्रवृत्तीचे लोक मुक्या जनावरांच्या जीवावर उठल्याचे दिसून येत आहे.या घटनेबाबत संताप व्यक्त केला जात आहे.
पिंपरी: इमारतीवरून खाली फेकल्याने कुत्र्याचा मृत्यू झाल्याची घटना पिंपळे गुरव येथे घडली.या घटनेबद्दल नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.या प्रकरणी अज्ञात व्यक्तिविरोधात सांगवी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फरीनजहा विसाल शेख यांनी फिर्याद दिली आहे.पांढरा रंग त्यावर काळ्या व तपकिरी रंगाचे डाग असलेल्या अंदाजे सात महिने वयाच्या भटक्या कुत्र्याला अज्ञात व्यक्तीने इमारतीच्या टेरेस वरून खाली फेकले.
सुदर्शनगर,सृष्टी चौक येथे शनिवारी दुपारी बाराच्या सुमारास घडलेल्या या घटनेत गंभीर जखमी झाल्याने कुत्र्याचा मृत्यू झाला.याप्रकरणी शेख यांनी फिर्याद दिल्यानंतर सांगवी पोलीस ठाण्यात भारतीय दंड विधान कलम 429 कालमांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या कुत्र्याला नेमके कुठल्या इमरतीवरून टाकण्यात आले,आरोपी कोण आहे याबाबत अधिक तपास चालू आहे.