अल्पवयीन मुलीची आत्महत्या; सुसाईड नोटमधील कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

अल्पवयीन मुलीची आत्महत्या; सुसाईड नोटमधील कारण वाचून तुम्हालाही बसेल धक्का

 

एका १७ वर्षीय अल्पवयीन मुलीने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना पंढरपूरमध्ये घडली आहे. या घटनेमुळे संपूर्ण शहरात एकच खळबळ उडाली आहे. आत्महत्या करणाऱ्या मुलीच्या बॅगेमध्ये एक सुसाईड नोट सापडली असून त्यामध्ये तिने आत्महत्येचे कारण देखील लिहिले आहे. ते कारण वाचून तुम्हालाही धक्का बसेल.

नेमके काय घडले?
पंढरपूर तालुक्यातील शेळवे गावात सत्यावान प्रभु गाजरे (४३) आपल्या कुटुंबासोबत राहत होते. त्यांचे गावात पंचरचे दुकान आहे. त्यामुळे दुकानाच्या आधाराव ते आपल्या कुटुंबाचे पोट भरत होते. तर त्यांची एक मुलगी स्वप्नाली ही केबीपी कॉलेजमध्ये इयत्ता अकरावीत तर दुसरी बारावीमध्ये वाडी कुरोली येथील कॉलेजमध्ये शिकत होती. मात्र, कोरोनाच्या काळात कॉलेज बंद करण्यात आल्या कारणांनी त्या दोघीही घरुनच ऑनलाईन शिक्षण घेत होत्या. दरम्या, ६ डिसेंबर रोजी स्वप्नालीने अचानक राहत्या घरी असलेल्या खोलीमधील पत्र्याच्या अँगलला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. सुरुवातीला तिने आत्महत्या का केली? याची कोणालाच माहिती मिळाली नाही. दोन दिवसांनी स्वप्नालीची शाळेची बॅग तपासण्यात आली. त्या बॅगमध्ये अर्ध्या पानाची चिठ्ठी आढळून आली. त्या चिठ्ठीत तिने आत्महत्येचे कारण लिहिले होते.

हे होते आत्महत्येचे कारण
‘किती सहन करू मी मला आता अजिबात सहन होत नाही. तिरंगा आणि आर्मीचा गणवेश माझ्या नशिबात नाही. कारण रमेश गाजरे, लहु ट्रेलर, स्वप्नील कौलगे यांनी माझ्या स्वप्नाचा तर धुराळाच केलाय. रमेश गाजरेनं हात धरुन केलेली छेडछाड आणि कुणाला सांगू नको म्हणून दिलेली जीव मारणार ही धमकी मला सहन होत नाही. लहु ट्रेलर स्वप्नीलला घेवून दुकानात मोठमोठ्याने घाणरेडी गाणी लावायचा आणि नाचायचा. जाता – येता त्यांच्या नजरेचा मला खूप त्रास व्हायचा आजपर्यंत सहन केलं. पण, आता सहन होत नाही, म्हणून मी आज माझं जीवन संपवतेय. हे भारत माते मला माफ कर, आई-बापू मला माफ करा आत्महत्या करणे गुन्हा आहे. तरी सुद्धा मी करतेय’असे तिने तिच्या चिठ्ठीत लिहिले होते.

दरम्यान, फिर्याद दाखल करून घेण्याबात उशीर झाल्याबद्दल पंढरपूर ग्रामीण पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक प्रशांत भस्मे यांच्याकडे विचारणा केली असता सदर मुलीने आत्महत्या कारण्यापूर्वी लिहलेली सुसाईड नोट ही एका बॅगमध्ये ठेवलेली आढळली आहे. त्यानंतर सदर मुलीच्या पित्याने संपर्क करून आम्हाला याची माहिती दिली. त्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तात्काळ आरोपींना ताब्यात घेतले आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. या घटनेचा अधिक तपास पोलीस करत आहे.

 

अभिप्राय द्या..