खवणे येथील श्री देव खवणेश्वराचा उदया रविवारी वार्षिक जत्रौत्सव..

खवणे येथील श्री देव खवणेश्वराचा उदया रविवारी वार्षिक जत्रौत्सव..

उदया वार्षिक जत्रौत्सवा निमित्त श्री देव खवणेश्वोर होणार घोडयावर स्वार..

कुडाळ /-

खवणे येथील श्री देव खवणेश्वर देवाचा उदया रविवार दि.13 डिसेंबर रोजी वार्षिक जत्रौत्सव साजरा होत आहे.नवसाला पावणारा व भक्तांच्या हाकेला धावणारा अशी ख्याती असलेल्या श्री देव खवणेश्वराच्या उदया साजरा होणार्या वार्षिक जत्रौत्सवा निमित्त मंदिरात सकाळपासून श्री देव खवणेश्वराचे दर्शन व आशिर्वाद घेण्यासाठी तसेच नवस फेडण्यासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार आहे.तर रात्रौ उशिरा पालखी प्रदक्षिणा नंतर दशावतार मंडळाचे नाटक होणार आहे.तरी सर्व भाविकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन खवणे येथील ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.

अभिप्राय द्या..