मुंबई : कोरोनाच्या संकटामुळे थर्टी फर्स्टच्या सेलिब्रेशनसाठी मुंबईत यंदा नवे नियम असणार आहेत. थर्टीफर्स्ट कसा साजरा करायचा याचे नियम मुंबई महापालिका २० डिसेंबरला जाहीर करणार आहे. अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी ही माहिती दिली.
दिवाळीत फटाके फोडण्यावर जसे निर्बंध होते, तशा प्रकारचे निर्बंध महापालिका थर्टी फर्स्टसाठी घालण्याची शक्यता आहे. कोरोनाच्या काळात अलिकडेच गर्दी केल्याने आणि कोरोनाचे नियम न पाळल्याने मुंबई महापालिकेने काही पब्ज आणि नाईट क्लबवर कारवाई केली होती. इतकेच नाही तर महापालिका आयुक्तांनी राज्य सरकारला पत्र लिहिले आहे आणि मुंबईत नाईट कर्फ्यू लावायची मागणी केली आहे.