रायबाग/बेळगाव :
येथील फळविक्रेत्या महिलेवर शुक्रवारी सायंकाळी सात वाजण्याचा सुमारास ऍसिड हल्ला झाला.यास्मिन तहसिलदार(वय ३६) असे तिचे नाव आहे. गंभीर अवस्थेत तिला बेळगाव जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.
हल्ला करणाऱ्या अन्नाप्पा सेठ याने विष प्राशन केले असून त्यालाही जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आले आहे.
दोघांवरही उपचार सुरू असून घटनेची नोंद रायबाग पोलीस स्टेशन मध्ये करून अधिक तपास चालू आहे.
यास्मिन ही रायबाग येथील जनता कट्टी रोडवर फळविक्रीचा व्यवसाय करते.काल सायंकाळी ७ वाजण्याचा सुमारास अन्नाप्पा सेठ तिथे आला व यास्मिन हिच्यावर ऍसिड फेकून फरार झाला.
घटनेची माहिती मिळताच रायबाग पोलीस घटनास्थळी दाखल झाले व त्यांनी तातडीने यास्मिन ला रायबाग येथील सरकारी रुग्णालयात हलविले.
मात्र गंभीर जखमी असल्याने तिला तात्काळ जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले.
काही वेळाने अन्नाप्पा स्वतः पोलिसात हजर झाला. मात्र हल्ल्यानंतर विष प
प्राशन केल्याने तोही अत्यवस्थ होता.या दोघांवर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू असून नेमका ऍसिड हल्ला का केला गेला हे समजू शकले नाही. या बाबत अधिक तपास रायबाग पोलीस करत आहे.