सावंतवाडी /-
संदीप सुकी यांनी आपला मुलगा आशिष संदीप सुकी याच्या वाढदिवसानिमित्त आपल्या कुटुंबासमवेत पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमास जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले. संदीप सुकी यांनी मुलगा आशिष याचा वाढदिवस कुटुंबियांसमवेत वेगळ्या पद्धतीने साजरा केला. वाढदिवसादिवशी त्यांनी पणदूर येथील जीवन आनंद संस्था संचलित संविता आश्रमास तांदुळ, गहू, साखर, तेल, कपडे आदी जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले.या वाटपावेळी संदीप सुकी यांच्या पत्नी तथा राष्ट्रीय काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश सदस्या विभावरी सुकी, मुलगा आशिष सुकी, मुलगी मधुरा सुकी आदी उपस्थित होते. त्यांनी राबविलेल्या या स्तुत्य उपक्रमाबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.