भाजपचे दिवंगत नेते गोपीनाथ मुंडे यांची आज १२ डिसेंबर रोजी जयंती आहे. गोपीनाथ मुंडे यांच्या जयंतीनिमित्त राजकीय क्षेत्रातून तसेच समाज माध्यामांतून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. दरम्यान, गोपीनाथ मुंडे यांचे पुतणे आणि राज्याचे सामाजिक न्याय व विशेष सहाय्य मंत्री धनंजय मुंडे यांनीही गोपीनाथ मुंडे यांना जयंतीनिमित्त अभिवादन केले आहे. आप्पा, तुम्ही अजूनही आमच्यात आहात असे म्हणत धनंजय मुंडे यांनी आठवणी जागवल्या.

धनजंय मुंडे यांनी ट्विट करत काका गोपीनाथ मुंडे यांच्याबाबतच्या आपल्या भावना व्यक्त करत अभिवादन केले आहे. जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत असेही धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे. ट्विट करत धनजंय मुंडे यांनी गोपीनाथ मुंडे यांच्याबद्दलच्या आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली आहे. “आप्पा…खरंतर जयंतीसारखे शब्द तुमच्याबद्दल वापरताना मनाला भावतच नाहीत! तुम्ही अजूनही आमच्यात आहात ही भावना कायम मनात असते. त्याच प्रेरणेतून मी दीन-दुबळ्यांची, ऊसतोड मजुरांची सेवा करण्याचा, त्यांची उन्नती साधण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. स्व.अप्पांच्या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन,” असे ट्विट धनंजय मुंडे यांनी केले आहे.

दरम्यान, धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांना देखील वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. “पवार साहेब.. एक नाव नाही ती एक कारकीर्द आहे, एक मोहीम, एक वसा आहे. राजकारण व समाजकारणात काम करणाऱ्या माझ्यासारखा लाखो तरुणांसाठी एक दिशा आहे, आदरणीय पवारसाहेबांना जन्मदिनानिमित्त मन:पूर्वक शुभेच्छा, अशा शब्दात धनंजय मुंडे यांनी शरद पवार यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page