सिंधुदुर्गात आजपासून ७० ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू..

सिंधुदुर्गात आजपासून ७० ग्रामपंचायतीत आचारसंहिता लागू..

ओरोस /-

गेले चार महीने प्रशासकीय राज्य असलेल्या जिल्ह्यातील ७० ग्राम पंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीचे बिगुल वाजले आहे. निवडणूक आयोगाने शुक्रवारी जाहिर केलेल्या राज्यातील ग्राम पंचायत सार्वत्रिक निवडणुकामध्ये या ७० ग्राम पंचायतींचा समावेश करण्यात आला आहे. या ग्राम पंचायत कार्यक्षेत्रापुरती आचारसंहिता आज पासून लागू झाली असून १५ जानेवारीला मतदान तर १८ जानेवारीला मतमोजणी होणार आहे. २१ जानेवारीला निकालाची अधिसूचना जाहीर होणार आहे त्यामुळे आता राजकीय धुळवड सुरू होणार आहे.

अभिप्राय द्या..