कुडाळ /-
वालावल येथील श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमितीने गेल्या साडे चार वर्षातील विकास कामांचा लोकार्पण सोहळा आणि नव्याने बांधण्यात येणाऱ्या अन्नपूर्णा इमारतीचे भूमिपूजन सोहळा शनिवार दि. १२ डिसेंबर रोजी सकाळी ११ वा. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री व खासदार नारायण राणे यांच्या शुभहस्ते होणार आहे.
यावेळी पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती अध्यक्ष महेश जाधव, माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वसेकर, पश्चिम महाराष्ट्र व्यवस्थापन समिती सदस्य चारुदत्त देसाई, पंचायत समिती सदस्य प्राजक्ता प्रभु, सरपंच निलेश साळसकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे
अॅड. संग्राम देसाई यांच्या अध्यक्षतेखाली श्री देव लक्ष्मीनारायण देवस्थान स्थानिक सल्लागार उपसमिती वालावल नेमणूक २०१६ मध्ये करण्यात आली या समितीने आपला कार्यकाल हाती घेतल्यावर सर्वप्रथम अपूर्ण अवस्थेत असलेले प्रवेशद्वाराचे काम पूर्ण केले त्याबरोबर २०० वर्षापूर्वीचे श्री देव लक्ष्मी नारायण मंदिराची मुखशाळा जीर्ण झाली होती ती मुखशाळा आज सागवानी लाकडात कोरीव काम करून पुरातन जपण्याचा प्रयत्न केला आहे व पूर्णत्वास नेली आहे हे सर्व करत असताना पर्यटन व रोजगार निर्माण व्हावा ही संकल्पना डोळ्यासमोर ठेवून मंदिर परिसर सुशोभीकरण करण्यात सुरुवात केली संपूर्ण मंदिर परिसरात जवळ पेविंग बॉक्स बसवण्यात आले आणि रंगरंगोटी करण्यात आली आहे हे सर्व करत असताना २२ मार्च रोजी कोरोनामुळे झालेले लॉकडाऊन सर्व घडी विस्कळीत झाली या काळात सामाजिक बांधिलकी डोळ्यासमोर ठेवून मोफत मास वाटप करण्यात आले लॉकडाऊन काळात ऑनलाइन अभ्यास व नोकरी करणा-यांसाठी फ्री वायफाय सेवा देण्यात आली या काळात श्री देव लक्ष्मीनारायण मंदिर पूर्णपणे सीसीटीव्हीच्या नियंत्रणाखाली असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पहिले देवस्थान असेल. हे काम करत असताना दीपक प्रभू (मुंबई) यांनी शालेय मुलांना ऑनलाईन अभ्यास व संगणक प्रशिक्षण घेता यावे या हेतूने संगणक कक्ष उभारला आहे या सर्व गोष्टींची दखल वालावल गावचे सुपुत्र राजेश कोचरेकर यांनी घेवून श्री देव लक्ष्मीनारायण समितीस वातानुकुलित रुग्णवाहिकेचा दिली त्याचा लोकार्पण सोहळा होणार आहे. तरी या कार्यक्रमाला उपस्थित रहावे असे आवाहन स्थानिक सल्लागार उपसमिती अध्यक्ष अॅड. संग्राम देसाई यांनी केले आहे.