तिसऱ्या दिवसाचे दिन-प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जठार यांची कुडाळ येथे माहीती..
कुडाळ /-
भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी.नड्डाजी दिनांक १८ डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. तीन दिवसांच्या त्यांच्या भरगच्च दौऱ्यासाठी प्रवास प्रमुख म्हणून आम.रविंद्र चव्हाण यांची तर तिसऱ्या दिवसाच्या कार्यक्रमासाठी दिनप्रमुख म्हणून सिंधुदुर्ग जिल्ह्याचे माजी जिल्हाध्यक्ष प्रमोद जठार यांच्यावर पार्टीने जबाबदारी सोपवली आहे. सिंधुदुर्ग जिल्हा भाजपाच्या वेगवान वाढीसाठी ही अतिशय सकारात्मक दिशा देणारी घटना असल्याचे मत राजकीय वर्तुळातून व्यक्त केले जात आहे.
दिनांक १८ डिसेंबरपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत असलेल्या राष्ट्रीय अध्यक्षांचा तीन दिवसांचा कार्यक्रम महाराष्ट्रात आहे. बूथ कार्यकर्ता संमेलन,बुद्धिजीवी संमेलन, संघ समन्वय बैठक, महाराष्ट्र सोशल मीडिया सोबत चर्चा यासह पक्षाच्या विविध बैठका या दौऱ्याच्या दरम्यान संपन्न होणार आहेत.
तिसऱ्या दिवसाचे दिन-प्रमुख माजी जिल्हाध्यक्ष प्रमोदजी जठार असल्यामुळे जिल्ह्याबाबत काही महत्त्वाचे आणि हिताचे निर्णय ते नक्कीच घडवुन आणतील, असे जठार यांनी कुडाळ येथे मीडियाशी बोलताना सांगितले आहे.