मुंबई : आदिवासी विभागाचे माजी मंत्री आणि भाजप नेते विष्णू सावरा यांचे बुधवारी मुंबईत निधन झाले. ते 70 वर्षांचे होते. गेल्या दोन वर्षांपासून ते यकृताच्या आजाराने त्रस्त होते. १९८० मध्ये स्टेट बँकेतील मोठ्या पगाराची नोकरी सोडून त्यांनी भारतीय जनता पक्षाचे सदस्यत्व स्वीकारले. 1980 आणि 1985च्या विधानसभा निवडणुकीत त्यांना पराभव पत्करावा लागला होता. 1990च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी पहिला विजय मिळवला. त्यानंतर सलग सहावेळा त्यांनी विजय मिळवला. 1995 च्या युती सरकारच्या काळात त्यांना शेवटच्या टप्प्यात 1 फेब्रुवारी 1999 रोजी आदिवासी विकास मंत्री होण्याचा मान मिळाला.