वैभववाडी :
सिंधुदुर्ग जिल्हा परिषद सन 2018 – 19 चा उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार उपक्रमशील शिक्षक चेतन बोडेकर यांना जाहीर झाला आहे. पुरस्कार प्राप्त श्री. बोडेकर यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे. मुलींची उत्कृष्ट पटनोंदणी पुरस्कार शिक्षणाधिकारी (प्राथमिक) श्री. आंबोकर यांनी नुकतेच जाहीर केले आहेत. विद्या मंदिर सोनाळी प्रशालेच्या शिक्षिका श्रीम. दर्शना द. सावंत व विद्या मंदिर लोरे मांजलकरवाडी प्रशालेचे शिक्षक चेतन बोडेकर यांना तालुक्यातून पुरस्कार जाहीर झाले आहेत. वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मुकूंद शिनगारे यांनी पुरस्कार प्राप्त चेतन बोडेकर यांचा प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन गौरव केला. यावेळी गटसमन्वयक शिवाजी पवार, केंद्रप्रमुख गौतम तांबे, संतोष गोसावी, विजय केळकर, यशवंत वळवी, श्री. सूर्यवंशी, भीमराव तांबे व कर्मचारी उपस्थित होते.
चेतन बोडेकर वैभववाडी तालुक्यात आदर्श व उपक्रमशील शिक्षक म्हणून ओळखले जातात. कवी, गझलकार म्हणूनही त्यांनी वेगळी ओळख जिल्ह्यात निर्माण केली आहे. नुकताच त्यांचा गावय हा कवितासंग्रह प्रकाशित झाला आहे. रत्नागिरी व सिंधुदुर्ग या दोन जिल्ह्यासाठी दिला जाणारा बा.रा. कदम ज्ञानदर्शी शिक्षक पुरस्कार त्यांनी मिळविला आहे. बहुजन कर्मचारी आयोजित देश माझा या कवितेत श्री बोडेकर यांनी जिल्ह्यात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. चेतन बोडेकर हे सध्या श्री रामेश्वर विद्या मंदिर एडगांव नं. 1 या प्रशालेत कार्यरत आहेत. तेजस प्रकल्पांतर्गत टॅग कॉर्डिनेटर म्हणून ते काम पाहत आहेत. कोरोनाच्या महामारीत शासन नियमांचे पालन करत ज्ञानदानाचे प्रामाणिक व नियोजनबद्ध काम ते सध्या करत आहेत. पुरस्कार मिळाल्यानंतर बोडेकर यांचे तालुक्यात सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
फोटो – पुरस्कार प्राप्त शिक्षक चेतन बोडेकर यांना प्रमाणपत्र देताना वैभववाडी गटशिक्षणाधिकारी मुकुंद शिनगारे, केंद्रप्रमुख व कर्मचारी.