वैभववाडीः
वैभववाडी तालुक्यात हेत येथे एकाच कुटुंबातील सहा जणांना कोरोनाची लागण झाली आहे.त्यामुळे तालुक्यातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या १६० वर पोहचली आहे.तर सध्या ९ रुग्ण सक्रीय असून त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.मध्यंतरी तालुका कोरोनामूक्त झाला होता.परंतु गेल्या काही दिवसात पुन्हा रुग्ण संख्येत भर पडत आहे.त्यामुळे पुन्हा एकदा तालुक्यातील नागरीकांच्या चिंतेत भर पडली आहे.
वैभववाडी तालुक्यात सुरुवातीपासूनच कोरोना पादुर्भाव नियंञणात ठेवण्यात आरोग्य प्रशासन यशस्वी झाले आहे.तालुक्यात आॕगस्ट व सप्टेंबर मध्ये रुग्ण संख्येत वाढ झाली होती.त्यानंतर आॕक्टोबरमध्ये रुग्ण संख्येत घट होऊन तालुका कोरोनामूक्त झाला होता.माञ नोव्हेंबर अखेर परत एक एक रुग्ण वाढत जाऊन सध्य स्थितीत ९ सक्रीय रुग्ण आहेत.
सध्या तालुक्यात हेत ६, उंबर्डे १, कोकिसरे १,गडमठ १, असे ९ रुग्ण सक्रीय आहेत.
कोरोनाचा पादुर्भाव रोखण्यासाठी सर्वांनी मास्कचा वापर करावा.हात स्वच्छ धुणे, सुरक्षित अंतर ठेवणे अशी खबरदारी घ्यावी.असे आवाहन आरोग्य विभागाकडून करण्यात येत आहे.
