उद्योग मंत्र्यांच्या उपस्थितीत मुंबईत बैठक संपन्न..
कुडाळ /-
चिपी विमानतळाचे तांत्रिक काम ३१ डिसेंबर पूर्वी पूर्ण करण्याचे आश्वासन आयआरबी कंपनीच्या माध्यमातून देण्यात आले आहे.त्यामुळे अनेक दिवस रेंगाळलेले काम मार्गी लागण्याची शक्यता आहे.आज याबाबत महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री सुभाष देसाई यांच्या उपस्थितीत मंत्रालयात खास बैठक घेण्यात आली. यावेळी संबंधित अधिकाऱ्यांनी हे आश्वासन दिले आहे. यावेळी वीज मंडळाचे बीएसएनएलचे एमआयडीसीचे अधिकारी उपस्थित होते.खासदार विनायक राऊत यांच्या पुढाकाराने ही बैठक घेण्यात आली.