वेंगुर्ले /-
वेंगुर्ले शहरातील आनंदवाडी प्रवेशद्वारापासून स्मशानभूमी पर्यंत जाणाऱ्या २२५ मीटर लांबीच्या सिमेंटीकरण रस्त्या संदर्भात आज वेंगुर्ले शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांच्या नेतृत्वाखाली येथील स्थानिक नागरिक व नगरसेवक मुख्याधिकार , शिवसेना पदाधिकारी यांची एकत्रित बैठक झाली. या बैठकीत रस्त्यासंदर्भात स्थानिक नागरिकांची परवानगी घेऊन येत्या आठ दिवसात रस्त्याचे काम करण्याचा निर्णय घेण्यात आला,वेंगुर्ले आनंदवाडी येथील प्रवेशद्वारापासून स्मशानभूमी पर्यंत जाणाऱ्या २२५ मीटर लांबीच्या सिमेंटीकरण रस्त्या करण्यासाठी येथील स्थानिक नागरिकांच्या एक दोन झाडे व रस्त्या रुंदीकरणासाठी जमीनी जात असल्याने या रस्त्याचे काम बऱ्याच दिवसांपासून रखडले होते.
या रखडल्या कामा संदर्भात वेंगुर्ले शिवसेना शहरप्रमुख अजित राऊळ यांनी पुढाकार घेऊन स्थानिक नागरिक व शिवसेना पदाधिकारी व मुख्याधिकारी यांना एकत्रित घेऊन बैठक घेतली या बैठकीत विस्तृत चर्चेअंती स्थानिकानी रस्त्याच्या कामास परवानगी घेऊन येत्या आठ दिवसात सदर रस्त्याचे काम सुरू करण्याचे ठरले.यावेळी यावेळी उपनगराध्यक्ष अस्मिता राऊळ, नगरसेवक तुषार सापळे, संदेश निकम, शिवसेना जिल्हा सदस्य सचिन वालावलकर, उपजिल्हाप्रमुख सुनील डूबळे, सुनील वालावलकर, मुख्याधिकारी अमितकुमार सोंडगे, अभियंता श्री. नेमाने आनंदवाडी येथील स्थानिक नागरिक उपस्थित होते.