वैभववाडी/-

कुर्ली तालुका, वैभववाडी या गावातील कुमारी नम्रता नरेश पाटील ही सप्टेंबर 2020 मध्ये नॅशनल टेस्टिंग एजन्सीने घेतलेल्या युजीसी नेट -अर्थशास्त्र (National Eligibility Test) या राष्ट्रीयस्तरावरील परीक्षेत घवघवीत यश संपादन करून असिस्टंट प्रोफेसरशिपसाठी पात्र ठरली आहे.
कुर्ली येथील सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील एका मुलीने गावचे व पालकांचे नाव उज्ज्वल केले आहे.तिच्या यशामध्ये तीने सातत्याने अभ्यास ,जिद्द व चिकाटी यामुळे यश संपादन केले आहे.
कुमारी नम्रता हीचे प्राथमिक शिक्षण केंद्रशाळा कुर्ली येथे झाले. माध्यमिक शिक्षण फोंडाघात तर पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण पुणे येथे झाले. पुण्यातील नामांकित फर्ग्युसन कॉलेजमध्ये अर्थशास्त्र विषयात चालू वर्षी तिने 74% गुणांसह पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. नम्रता हिने आपल्या शालेय जीवनात अनेक स्पर्धा – परीक्षांमध्ये यश संपादन केले आहे. अर्थशास्त्र विषयात संशोधन करण्याचा तिचा मानस आहे.
तिच्या या यशाबद्दल तिचे सर्वत्र कौतुक होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page