कुडाळ /-
कुडाळ शहराचे ग्रामदैवत श्री देव कुडाळेश्वराचा वार्षिक जत्रौत्सव शनिवार दि. ५ डिसेंबर रोजी कोरोना नियमावलीचे पालन करीत साध्या पद्धतीने साजरा करण्यात येणार आहे. दिवसभरात देवाला नारळ ठेवणे, नवस बोलणे, नवस फेडणे इत्यादी धार्मिक कार्यक्रम सुरक्षित अंतर ठेऊन करण्यात येणार आहेत. तसेच रात्री ११:०० वाजता श्रींची पालखी मिरवणूक व नंतर वालावल दशावतार नाट्यमंडळाचा नाट्य प्रयोग सादर होणार आहे. असे श्री देव कुडाळेश्वर उत्सव मंडळाचे सचिव महेश (बाळू) कुडाळकर यांनी मीडिया शी बोलताना म्हटले आहे.