वेंगुर्ला /-
मोदी शासनाने कृषी व शेतकरी संदर्भात पारित केलेल्या तीन कृषी विषयक काळ्या कायद्यांच्या विरोधात देशातील शेतकरी वर्ग निदर्शने करीत आहेत. या संदर्भात दिल्लीच्या सीमेवर शेतक-यानी फार मोठे आंदोलन उभे केले आहे. या आंदोलनाला पाठींबा देण्याचा निर्णय महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसने घेतला आहे. त्यानुसार आज वेंगुर्ला तालुका काँग्रेसच्या वतीने केंद्र सरकारने शेतकरी विरोधी केलेल्या काळ्या कायद्याच्या विरोधात व देशपातळीवर होत असलेल्या शेतक-यांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यासाठी धरणे आंदोलन करण्यात आले.
यावेळी भाजप हटाव किसान बचाव,केंद्रातील भाजप सरकारचा निषेध असो, भाजप सरकार हाय हाय, चले जाव चले जाव भाजप सरकार चले जाव अशा घोषणा देत भाजप सरकारचा निषेध केला. यावेळी जिल्हा काँग्रेसचे उपाध्यक्ष व प्रवक्ते इर्शाद शेख,तालुका अध्यक्ष व नगरसेवक विधाता सावंत, तालुका सेवादल अध्यक्ष विजय खाडे,नगरसेविका कृतिका कुबल,पंचायत समिती सदस्य साक्षी कुबल,तालुका सरचिटणीस उत्तम चव्हाण,मयुर आरोलकर,समीर नागवेकर,सागर नांदोसकर,संजय केरकर इत्यादी उपस्थित होते.