कुडाळ /-
कुडाळ नेरुरपार मार्ग मालवण हा राज्य रस्ता आणि कुडाळ एमआयडिसी मार्गे कवठी या रस्त्यावरुन चालत जाणे देखील जीवघेणे झालेले आहे.या दोन्ही रस्त्यांची दुरुस्ती करण्यासाठी यापूर्वी विविध संघटनांनी, पक्षीयांनी आंदोलने छेडून आपल्याला निवेदने देत लक्ष वेधले होते. मात्र तरी सुद्धा आपल्या सार्वजनिक बांधकाम खात्याने याकडे जाणीवपूर्वक दूर्लक्षच केले आहे. आता येत्या ९ डिसेंबर पर्यंत या रस्त्यांवर दुरुस्ती चे काम सुरु न झाल्यास आम्ही नेरुरवासीय नेरुर जकात नाका येथे तीव्र आंदोलन छेडनारा आहोत, असा इशारा नेरुर ग्रामस्थांनी सार्वजनिक बांधकाम खात्याला निवेदनाद्वारे दिला आहे.
ग्रामस्थांचे हे निवेदन कार्यकारी अभियंता अनामिका चव्हाण यांनी स्विकारले.यावेळी पंचायत समिती सदस्य संदेश नाईक, सरपंच शेखर गावडे, माजी सरपंच प्रसाद पोईपकर, कुणाल किनळेकर, अरुण चव्हाण, मयूर म्हाडेश्वर, अरुण मार्गी, प्रवीण नेरुरकर, देविदास नाईक आदी उपस्थित होते.