कुडाळ /-

युवा फोरम, भारत संघटना सद्ध्या (मिशन सिंड्रेला) नामक एक उपक्रम प्रसार माध्यमांच्या सहायाने राबवत आहे. खास महिलांच्या स्वच्छतेच्या दृष्टीने, त्यांच्या आरोग्याच्या दृष्टीने काही समस्या समजत जाणवत आहेत आणि त्यावर लक्ष केंद्रित करून युवा फोरम, भारत संघटना कार्यरत आहे..आणि म्हणूनच संघटनेने आपल्या काही सहकार्यांना घेऊन रानबांबुळी ग्रामपंचायत येथे काही महिलांसोबत ह्या विषयाला घेऊन संवाद साधला स्त्रियांनी आपली उपस्थिती दर्शवली,कोरोनाचे नियम पाळून हा जागृती कार्यक्रम पार पडला गेला. त्यांना त्यांच्या menstrual hygene चे महत्त्व, ह्या जागृतीचा उद्देश, स्वरूप, आपल्या खाजगी अवयवांची निगा कशी राखावी, काय करू नये काय करायला हवे ह्याचे ज्ञान आणि माहिती ह्या युवा फोरम सदस्यांनी आणि त्याच्या स्वयंसेवकांनी ह्या महिलांना दिली.

त्या महिलांसोबत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या, त्यांना उद्भवणारे प्रश्न आणि त्यांच्या कडे अभाव असलेल्या सुविधा यावर काही ना काहीतरी आणि लवकरच तोडगा काढला जाईल ह्याचे आश्वासन देऊन ह्या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.हा विषय दुर्लक्ष करण्याचा नसून त्याबाबत जागृत होऊन त्याप्रमाणे वागण्याचा विषय आहे. विविध रोग आणि आजार हे ह्याच दुर्लक्षितेमुळे पसरतात ह्याची जाणीव गावातील प्रत्येक महिलेला झाली पाहिजे हे लक्षात ठेऊन रानबांबुळी ग्रामपंचयात चे सरपंच श्री. वसंत बांबुळकर व रानबांबुळी ग्रामपंचायत सदस्य सौ. अंजली कदम, सौ. दिशा ठाकूर, ग्रामसेवक सौ. लुडबे मॅडम, पंचयात समिती सदस्य सौ. सुप्रिया ताई वालावलकर यांच्या सहकार्याने युवा फोरम, भारत चे संघटना प्रमुख यशवर्धन राणे, तसेच उप संघटना प्रमुख अमोल निकम, सचिव हितेश कुडाळकर आणि युवा फोरम, भारत संघटना वेंगुर्ला प्रदेश च्या प्रदेशाध्यक्ष सायली चवण आणि ह्या बरोबर युवा फोरम भारत, संघटनेचे स्वयंसेवक मीता परब, श्रद्धा राऊळ, दीप्ती चव्हाण, वैशाली परब, आकाश मुणगेकर आणि हार्दिक कदम यांनी रानबांबुळी ग्रामपंचयात मधी ह्या उपक्रमासाठी भेट दिली.

अशा प्रकारे युवा फोरम, भारत संघटना ह्या आणि अश्या बऱ्याच समस्यांना वाचा फोडून त्यांचे निवारण करण्याच्या तयारीत आहेत. आणि ही एक समाजासाठी आदर्शवत बाब आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page