मालवण तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत सुरू करा…

मालवण तालुक्यातील एसटी बससेवा पूर्ववत सुरू करा…

मालवण /-

शासनाने नववी ते बारावीपर्यंत शाळा व महाविद्यालय सुरू करण्याची परवानगी दिली असली तरी वेळेत एसटी वाहतूक नसल्याने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांची व सामान्य नागरिकांची ये-जा करण्याची मोठी गैरसोय होत आहे. त्यामुळे मालवण तालुक्यात एसटीच्या दैनंदिन फेर्‍या पूर्ववत करा, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष मिलिंद घाडगे यांनी मालवण आगार व्यवस्थापकांकडे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लॉकडाउन काळात बंद असलेली एसटी बससेवा पूर्ववत सुरू करा, तसेच एसटीच्या दैनंदिन फेऱ्यांबाबत वेळापत्रकाची प्रसिद्धी बसस्थानकात फलकाद्वारे करा, अशीही मागणी त्यांनी केली आहे . यावेळी जिल्हा सरचिटणीस प्रमोद कांडरकर, माजी ग्राहक संरक्षण अध्यक्ष रमण वाईरकर उपस्थित होते.

अभिप्राय द्या..