वेंगुर्ला /-

वेंगुर्ला ग्रामदेवता श्री देवी सातेरीचा पहिला वार्षिक जत्रोत्सव उत्साहात संपन्न झाला.यावर्षी कोरोनाचे संकट असल्याने येथील श्री देवी सातेरीचा वार्षिक जत्रोत्सव साध्या पद्धतीने व तालुका मर्यादित करण्याचा निर्णय देवस्थान विश्वस्त समिती, उत्सव समिती व मानकरी मंडळी यांच्या झालेल्या सभेमध्ये घेण्यात आला होता.
त्यानुसार शासनाच्या निर्णयानुसार मास्कचा वापर,सॅनिटायझेशन तसेच सोशल डिस्टनसिंग चा अवलंब करून हा जत्रोत्सव संपन्न झाला.यावेळी देवतेची आकर्षक सजावट,पुष्पसजावट ,तरंगदेवता , पालखी आकर्षक
सजावट करण्यात आली होती.येथील देवस्थान समिती,
विश्वस्त, मानकरी तसेेेच नागरिकांच्या सुयोग्य नियोजनामुळे जत्रोत्सव
भक्तिमय वातावरणात संपन्न झाला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page