सिंधुदुर्गनगरी /-
महाराष्ट्र केंद्र सरकारने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या नावाने ज्या नाविन्यपूर्ण योजना काढलेल्या आहेत या योजना तळागाळातील शोषित पिढी समाजापर्यंत पोचलेल्याच नाही, या संदर्भात बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया तथा भारतीय बौद्ध महासभेतर्फे २६ जानेवारीपासून शोषित पीडित समाजाच्या विविध समस्यांबाबत आंदोलन सुरू करण्यात आले आहे, हे आंदोलन अजूनही सुरू असून जोपर्यंत न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आंदोलन सुरूच राहणार, असा इशारा रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया जिल्हाध्यक्ष रावजी यादव यांनी दिला आहे.