कुडाळ /-
शिवसेना सचिव, खासदार विनायक राऊत यांच्या आदेशानुसार, सिंधुदुर्ग जिल्हा संपर्कप्रमुख अरुण दुधवडकर यांनी कुडाळ तालुका संघटक पदी बबन बोभाटे यांची नियुक्ती केली आहे.शिवसेना पक्षाने संघटना बांधणी वर भर दिला असून कार्यकर्त्यांवर वेगवेगळ्या जबाबदाऱ्या सोपविल्या जात आहेत. बबन बोभाटे यांची नियुक्ती कुडाळ तालुका संघटक पदी झाल्याने त्यांचे अभिनंदन केले जात आहे.