गावातील प्रवाशांची गैरसोय तर मुंबईतील लोकांची सोय असे धोरण ठेऊ नये..

वेंगुर्ला/-

वेंगुर्ले तालुक्यातील एस् .टी. प्रवाशांची गैरसोय करुन मुंबईतील लोकांची सोय करण्यासाठी वेंगुर्ले आगारातील ड्रायव्हर व कंडक्टर पाठवु नयेत,असे निवेदन भाजपा वेंगुर्लेच्या वतीने वेंगुर्ले आगारप्रमुखांना देण्यात आले आहे.अन्यथा वेंगुर्ले आगाराला टाळे ठोकू, असा इशारा भाजपाच्या वतीने देण्यात आला आहे.

वेंगुर्ले आगारातुन मुंबईतील बेस्ट प्रवाशांच्या सोयीकरीता ह्यापूर्वी दिनांक १४ नोव्हेंबर रोजी ५५ ड्रायव्हर व कंडक्टर पाठवीले होते व आता पुन्हा ५२ ड्रायव्हर व कंडक्टर मुंबईला पाठविण्यात येणार आहेत असे समजते.जर वेंगुर्ले आगारातुन १०८ ड्रायव्हर व कंडक्टर मुंबईला पाठविले तर वेंगुर्ले आगाराच्या वेळापत्रकाचा फज्जा उडणार आहे. सद्यस्थीतीत वेंगुर्ले आगाराच्या ४५ फेऱ्यातून ८९०० की.मी.रनींग होते. परंतु हे ड्रायव्हर व कंडक्टर मुंबईला पाठविले तर तालुक्यातील फक्त ८ मार्ग चालु रहाणार आहेत .तसेच हे वेळापत्रक २८ नोव्हेंबर ते ३ डिसेंबर या कालावधीत चालणार आहे .त्यामुळे वेंगुर्लेवासीय प्रवाशांचे प्रचंड हाल होणार आहेत व त्याचा नाहक फटका वेंगुर्ले वासीयांना भोगावा लागणार आहे.मुंबईतील बेस्ट प्रवाशांच्या सोयीकरीता परिवहन मंत्री कोकणातील प्रवाशांवर अन्याय करत आहेत.मुंबई महानगरपालिका निवडणुक डोळ्यासमोर ठेवून मुंबईकरांच्या सोयीकरीता ग्रामीण प्रवाशांवर अन्याय करण्याचे काम आघाडी सरकार करत आहे व याचा जाब भारतीय जनता पार्टी – वेंगुर्ले च्या वतीने विचारला जाणार आहे.वेंगुर्ले आगारातुन पुन्हा ड्रायव्हर व कंडक्टर मुंबईला पाठवीले तर एस्. टी. डेपोला टाळे ठोकणार,असा इशारा भाजपा जिल्हा सरचिटणीस
प्रसन्ना ऊर्फ बाळु देसाई यांनी दिला आहे.वेंगुर्लेवासीय एस्. टी.प्रवासी वर्गाचे हाल करून मुंबईकरांच्या सोयीकरीता एस्. टी.प्रशासनाने ५२ ड्रायव्हर व कंडक्टर मुंबईला पाठविले तर दिवसभरात फक्त आठ फेऱ्या होणार असतील तर संपुर्ण डेपोच बंद करावा.म्हणजे प्रवाशांच्या सोयीकरीता हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करणाऱ्या एस्. टी. प्रशासनाला प्रवाशांच्या गैरसोयीकरीता हे ब्रीदवाक्य घेऊन वाटचाल करण्याची पाळी ठाकरे सरकारने एस्. टी.वर आणली.या आंदोलनलामध्ये जिल्हा सरचिटणीस प्रसन्ना देसाई,तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर,जिल्हा उपाध्यक्ष सोमनाथ टोमके, जि.का.का.सदस्य साईप्रसाद नाईक व वसंत तांडेल,ता. सरचिटणीस बाबली वायंगणकर,मच्छिमार सेलचे जिल्हाध्यक्ष दादा केळुसकर, परबवाडा सरपंच पपु परब, युवा मोर्चाचे संदीप पाटील व अमेय धुरी, नारायण गावडे आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page