सिंधुदुर्गनगरी/-
जिल्ह्यात आज दुपारी १२ वाजेपर्यंत एकूण ४ हजार ८८६ कोरोना बाधीत रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत.सद्यस्थितीत जिल्ह्यात १९८ रुग्णांवर सुरू आहेत. जिल्ह्यात आज आणखी १७ व्यक्तींचा कोरोना तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आले.दाणोली येथील ७२ वर्षीय पुरुषाचा आज कोविड -१९ मुळे मृत्यू झाला आहे. त्यास मधुमेह व उच्चरक्तदाबाचा त्रास होता.अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीमंत चव्हाण यांनी दिली आहे.