देवगड- आचरा मार्गवरील बसफेऱ्या पुर्ववत करा! गोविंद सावंत यानी निवेदनाद्वारे वेधले लक्ष

देवगड- आचरा मार्गवरील बसफेऱ्या पुर्ववत करा! गोविंद सावंत यानी निवेदनाद्वारे वेधले लक्ष

मसुरे /-

देवगड हिंदळे, मुणगे,आचरा मार्गावरील बहुतांश बसफेऱ्या देवगड आगारातुन बंद केल्याने सर्वसामान्य ग्रामस्थांची गैरसोय होत आहे. बंद केलेल्या सदर बसफेऱ्या पूर्ववत चालु कराव्यात अशी मागणी मुणगे येथील सामाजीक कार्यकर्ते गोविंद सावंत यानी निवेदना द्वारे केली आहे.
कोरोना कालावधीत बंद केलेली देवगड आगारातुन सकाळी ९.३० वाजता सुटणारी देवगड- हिंदळे- मुणगे- पोयरे- आचरा मार्गे कणकवली जाणारी बस फेरी अद्यापि बंद आहे. अनलॉक नंतर देवगड आगारातील एकच वस्तीची देवगड आचरा मोर्वे ही बसफेरी चालु करण्यात आली आहे. हिंदळे, मुणगे, पोयरे भागातील सर्वसामान्य प्रवाशाना कणकवली तसेच इतर लांब पल्याच्या प्रवासास जाण्यासाठी एसटीची बसफेरी नसल्याने फारच गैरसोयीचे झाले आहे. सकाळी ८.३० वाजता सुटणारी देवगड- मालवण बसफेरी तसेच दहीबाव, नारिंग्रे मार्गावरील सकाळच्या बसफेऱ्या पुर्ववत करण्याची मागणी श्री भगवती देवस्थान मुणगेचे विश्वस्त गोविंद सावंत यानी देवगड आगार प्रमुख श्री मांगेलकर यांच्या जवळ निवेदना द्वारे केली आहे.

अभिप्राय द्या..