कुडाळ /-

पारिभाषित अंशदान पेन्शन /राष्ट्रीय पेन्शन योजना बंद करून 1982ची जूनी पेन्शन योजना लागू करावी, शिक्षणसेवक योजना बंद करून नियमित शिक्षक नेमणूक द्यावी, राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील घातक तरतूदी मागे घ्याव्यात, शेतकरी विरोधी कायदे मागे घ्यावेत अशा प्रमुख मागण्यांसह विविध प्रलंबित मागण्यासाठी राज्य सरकारी निमसरकारी शिक्षक कर्मचारी समन्वय समिती महाराष्ट्र राज्य यांचे वतीने 26 नोव्हेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संपाची हाक देण्यात आली असून या संपात सिंधुदुर्ग जिल्ह्यातील तमाम शिक्षक बांधवांनी सहभागी व्हावे असे आवाहन प्राथमिक शिक्षक समिती शाखा सिंधुदुर्ग चे जिल्हाध्यक्ष नितीन कदम ,राज्य उपाध्यक्ष राजन कोरगावकर, जिल्हा सरचिटणीस सचिन मदने, जिल्हा शिक्षक नेते नंदकुमार राणे, कार्याध्यक्षनारायण नाईक, जिल्हा प्रवक्ता सुनिल चव्हाण, ज्येष्ठ मार्गदर्शक भाई चव्हाण, चंद्रकांत अणावकर, जिल्हा उपाध्यक्ष चंद्रसेन पाताडे, लवू चव्हाण, जिल्हा कोषाध्यक्ष लहू दहिफळे यांचेसह राज्य पदाधिकारी नामदेव जांभवडेकर, दिलिप कदम, शरद नारकर, सुरेखा कदम यांनी प्रसिध्दीपत्रकाने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page