भटक्या जनावरांच्या संरक्षणासाठी प्राणीप्रेमी संघटित,होत कुडाळ येथील युवा फोरमच्या बैठकीत निर्णय..
कुडाळ /-
युवा फोरम ,भारत संघटनेमार्फत नव्या उपक्रमासाठी जी सुरुवात केली जात आहे त्याबाबत पहिलीच बैठक नुकतीच कुडाळ येथे बैठक संपन्न झाली . या बैठकीत युवा फॉर अँनिमल्स या मोहिमे अंतर्गत जिल्ह्यात भटक्या कुत्र्यांचे सॅनिटायझरेशन करणे (नसबंदी)करणे, भटक्या जनावरांचे संगोपन व लोकांमध्ये संरक्षणासाठी जागृती निर्माण करणे, प्राण्यांच्या संरक्षणासाठी तज्ञ डॉक्टरांची मदतीने विषेश प्रयत्न करणे असे अनेक महत्त्वाचे निर्णय यावेळी घेण्यात आले.
या बैठकीत प्राण्यांच्या संरक्षणासाठी अनेक महत्त्वाचे विषयांवर चर्चा करण्यात आली .यात प्राधान्याने भटक्या जनारांचे स्टेरीलायझेशन संबंधी निर्णय घेण्यात आला.त्यासंबंधी जिल्ह्यातील काही ठिकाणाहून मदत घेण्यात येऊन काही कमतरता असणाऱ्या सोयीसुविधा लवकरात लवकर पूर्णत्त्वास याव्यात या संबंधी काय करता येईल यासंबंधी बैठक घेतली गेली.पण या स्टेरीलायझेशन प्रोसेससाठी तज्ञ डॉक्टरांची गरज लागणार आहे मात्र सद्यस्थितीत याची कमतरता भासत आहे.त्यासाठीच युवा फोरम,भारत संघटना मार्फत सबंधित शासकीय विभागांच्या वरिष्ठांकडे व काही वेटरनरी डॉक्टरांकडे स्टेरेलायझेशनसाठी डॉक्टर उपलब्ध करून द्यावे आणि भटक्या जनावरांच्या रक्षणासाठी हे पाऊल उचलण्यासाठी हातभार लावून आपले योगदान द्यावे अशा प्रकारचे निवेदन सादर करण्यात येणार आहे .या मोहिमेचे नाव युवा फॉर अँनिमल्स असे यावेळी ठेवण्यात आले तसेच या बैठकीमध्ये या प्राण्यांच्या सरंक्षणबाबत जागृती करण्यात येईल हाही एक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला. या अनुषंगाने जिल्ह्यातील काही महत्त्वाच्या ठिकाणाला भटक्या प्राण्यांचे रक्षणासाठी त्यांना खाऊ घालण्यास सुरुवात केली जाणार आहे.
असे यावेळी ठरवण्यात आले. दर रविवारी ह्या प्राण्यांना खाऊ पिऊ घालून त्यांची देखभाल जितकी जास्त करता येईल तितकी करण्यात येणार आहे. अशा प्रकारचे गरजेचे आणि महत्त्वाचे निर्णय या बैठकीत घेण्यात आले अशी माहिती युवा फोरम संघटनेचे अध्यक्ष यशवर्धन राणे यांनी दिली.या बैठकीत प्राणी प्रेमी ओंकार मंडोलकर, यशदा वर्दम, यश बांदेकर,गायत्री राय,आकाश मुणगेकर,विपुल भावे,हर्षदा बागायतकर तसेच युवा फोरम,भारत संघटनेमधील संघटनाप्रमुख यशवर्धन राणे,उप संघटना प्रमुख अमोल निकम,सचिव हितेश कुडाळकर ,जय पडते,हार्दिक कदम,भूषण मेस्त्री,पूजा खानोलकर, सायली चव्हाण,श्रद्धा राऊळ,सिद्धी सावंत ,शुभम राणे आदी या बैठकीत उपस्थित होते.या बैठकीत अनेक प्राणी प्रेमींनी उस्फूर्तपणे सहभाग घेतला.