कुडाळ /-
युवा फोरमच्या वतीने राबविण्यात आलेल्या ” मिशन सिंड्रेला ” उपक्रमाला शिरोडा व रेडी येथे राबविण्यात आला.या मिशन सिंड्रेला उपक्रमास महिलांचा उस्फूर्त प्रतिसाद लाभला. या वेळी युवा फोरमची प्रदेशाध्यक्ष सायली चव्हाण, सचिव देवदत्त चव्हाण तसेच कार्यकारी मंडळातील शिवम नाईक, श्रद्धा बाविसकर परब, सुचित परब, श्रद्धा राऊळ, दिप्ती पंडित, संजना मयेकर, राजेश्वरी मुलिमणी, अक्षय परूळेकर, हर्षाली दिपनाईक, दिप्ती राणे, सिया आरोंदेकर, जया गावडे, संपदा तुळसकर, मयुरी परब आदीमहिला उपस्थित होत्या.
” मिशन सिंड्रेला ” हा उपक्रम युवा फोरम ही संघटना राबवत आहेत. आतापर्यंत हा उपक्रम मालवण, माड्याची वाडी आणि आरवली, वेंगुर्ला येथे राबविण्यात आला आहे. महिलांनी स्वतःची निगा, काळजी राखणे ह्याचे महत्त्व स्पष्ट करून त्यांना सॅनिटरी नॅपकिन्स वापरण्यास प्रवृत्त करणे, त्यांना बाजार किंमतीपेक्षा कमी दरात सॅनिटरी नॅपकिन्स उपलब्ध करून देणे ,जेणे करून कोणतीही महिला कुठल्याही आजाराला बळी पडता कामा नये, हे उद्दिष्ट्य साध्य करण्यासाठी आज युवा फोरम, भारतच्या या सदस्यांनी शिरोडा व रेडी येथे आपला दौरा केला. ह्या उपक्रमाला बऱ्याच ठिकाणी प्रतिसाद मिळत आहे. शिरोडा व रेडी प्रमाणेच अजून बऱ्याच ठिकाणी हा उपक्रम भावी काळात पार पाडला जाणार आहे.मिशन सिंड्रेला नामक उचललेला हा विडा युवा फोरम नक्कीच साध्य करील ह्यात शंका नाही असे संस्थेचे वतीने सांगण्यात आले.