कणकवली /-
कै. सत्यविजय भिसे यांच्या १८ व्या स्मृतिदिनानिमित्त शिवडाव राउतखोलवाडी येथे बाळा भिसे यांच्या निवासस्थानी श्रद्धांजली कार्यक्रम व रक्तदान शिबीर घेण्यात आले.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक व शिवसेना नेते संदेश पारकर यांच्या हस्ते कै. सत्यविजय भिसे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून श्रद्धांजली वाहण्यात आली.
याप्रसंगी माजी. जी. प. सदस्य बाळा भिसे, नगरसेवक सुशांत नाईक,निकेतन भिसे,नितीन हरमलकर,श्रीधर तेली,रुपेश आमडोस्कर,प्रशांत कुडतरकर,नंदकिशोर परब, नंदू परब, बंडू लाड, मधुकर चव्हाण आदींसह कै.सत्यविजय भिसे मित्रमंडळाचे कार्यकर्ते व शिवडाव ग्रामस्थ उपस्थित होते.