कुडाळ /-
नॅशनल हायवेच्या संपादन प्रक्रियेत सांगिर्डे येथील इमारत क्रमांक ४०५६ च्या अपहार प्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून या इमारतीचा हायवे संपादित प्रकियेत काहीही संबंध नसताना ही इमारत संपादित दाखवून लाखो रूपयांच्या शासकीय निधीचा अपहार केलेला आहे. या अपहार प्रकरणात जे जे जबाबदार असतील त्यांची चौकशी करून संबंधितांवर कारवाई करावी व खोटी संपादन प्रक्रिया करून मांगीलाल परमार यांना इमारत क्रमांक ४०५६ साठी दिलेली रक्कम वसूल करण्यात यावी.यासाठी गेले तीन चार महिन्यांपासून मागणी करूनही प्रांत कार्यालय व जिल्हाधिकारी कार्यालय यांच्याकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाही.
तसेच संबंधितांना या प्रकरणातून वाचविण्याचा प्रयत्न केला जात असल्याचे आमच्या निदर्शनास येत आहेत.त्यासाठी २१ नोव्हेंबर पर्यंत निर्णय देण्याची मागणी केली असतानाही अद्याप याबाबत निर्णय दिलेला नाही. त्यामुळे पक्षाच्या माध्यमातून घोषित केल्या प्रमाणे सोमवार दिनांक २३/११ /२०२० रोजी सकाळी १० वाजल्यापासून कुडाळ प्रांत कार्यालय येथे घंटानाद आंदोलन सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सोमवारी सकाळी दहा वाजता कुडाळ प्रांत कार्यालय येथे बहुसंख्येने उपस्थित राहून हे आंदोलन यशस्वी करावयाचे आहे. तरी वेळीच उपस्थित राहावे.असे आवाहन तालुका अध्यक्ष भास्कर परब ओबीसी जिल्हाध्यक्ष बाळासाहेब कनयाळकर यांनी केले आहे.