सिंधुदुर्गनगरी /-

मिशन बिगीन अगेन अंतर्गत पर्यटन क्षेत्र, तिर्थस्थळे, प्रार्थनास्थळे सुरू करण्यास परवानगी देण्यात आली आहे. तसेच हॉटेल, रेस्टॉरंट यासह खाजगी वाहतुकीसही परवानगी देण्यात आली आहे. त्यामुळे जिल्ह्यात समुद्र किनाऱ्यावर अनेक पर्यटक भेट देण्यासाठी येत आहेत. त्याअनुषंगाने जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावरील सर्व जलक्रीडा सुरू करण्यास परवानगी देणारे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत.
जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यावर विविध जलक्रीडा जसे बोटिंग, एटीव्ही रायडींग चालविले जातात. कोविड – 19 विषाणूच्या प्रादुर्भावाच्या अनुषंगाने प्रतिबंधात्मक उपाययोजनेचा भाग म्हणून शासनाने लागू केलेल्या निर्बंधांमुळे सदर जलक्रीडा प्रकार बंद करण्यात आलेले आहेत. पण सध्या मिशन बिगीन अगेन अंतर्गत हॉटेल व अनुषंगीक आस्थापना, लॉजेस, गेस्ट हाऊस तसेच इनडोअर व आऊटडोअर क्रीडा प्रकार मानक कार्यप्रणालीचा अवलंब करून सुरू करण्यास मान्यता दिली आहे. तसेच सर्व प्रकारच्या खाजगी, सार्वजनिक वाहतुकीसही मान्यता दिली आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पर्यटक जिल्ह्यातील समुद्र किनाऱ्यांना भेटी देत आहेत. त्यापार्श्वभूमीवर समुद्र किनाऱ्यावर चालणारे जलक्रीडा प्रकार सुरू करण्यास परवानगी देणारे आदेश जिल्हाधिकारी यानी दिले आहेत. आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 मधील कलम 25 व 30 तसेच महाराष्ट्र कोवीड 19 उपाययोजना नियम 2020 मधील नियम 10 अन्वये जिल्हाधिकारी यांना प्राप्त झालेल्या अधिकारानुसार जिल्हाधिकारी यांनी समुद्र किनाऱ्यावरील सर्व प्रकारच्या जलक्रीडा सुरू करण्याचे आदेश दिले आहेत.

सदर जलक्रीडांच्या ठिकाणी आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालय, भारत सरकार यांच्याद्वारे निर्गमित केलेल्या व सार्वजनिक आरोग्य विभाग महाराष्ट्र शासन, पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागामार्फत देण्यात आलेल्या मानक कार्यप्रणालीचा अवलंब करणे बंधनकारक आहे. तसेच शारीरिक अंतर पाळणे, मास्क घालणे, वेळोवेळी हात धुणे, सॅनिटायझरचा वापर करणे हे सर्व संबंधितांवर बंधनकारक आहे. सदर आदेशाचे उल्लंघन केल्यास भारतीय दंड विधान संहिता कलम 188, 269, 270, 271 तसेच आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 च्या कलम 51 सह अन्य तरतूदीनुसार फौजदारी शिक्षेस पात्र राहील असे आदेश जिल्हाधिकारी, सिंधुदुर्ग यांनी दिले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page