सावंतवाडी कडे जाणारा मार्ग खड्डेमय..

सावंतवाडी कडे जाणारा मार्ग खड्डेमय..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ला व कुडाळ – आकेरी सावंतवाडी या मुख्य मार्गावर ठिकठिकाणी खड्डयांचे साम्राज्य पसरले आहे.जनतेच्या हिताच्या दृष्टीने या मार्गावरील खड्डे त्वरित बुजविण्यात यावेत,अशी जोरदार मागणी करण्यात आली आहे.मुंबई – गोवा हायवे झाल्यानंतर वेंगुर्ले,कुडाळ तसेच माणगावहून सावंतवाडी कडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावरील खड्डे बुजविण्याकडे संबंधित विभागाचे पूर्णतः दुर्लक्ष झाल्याचे जाणवत आहे.नेमळे तिठा पासून पुढे आकेरी पासून कोलगावपर्यंत मुख्य रस्त्यावर मोठ्या प्रमाणात “धोकादायक” खड्डे पडले असून छोटे – मोठे वाहनधारक यांच्यासाठी जीवघेणे ठरत आहेत.बहुतांश ठिकाणी मुख्य रस्त्याची साईडपट्टी खचली असून धोकादायक बनली आहे.या मार्गावरील वाहनांची मोठ्या प्रमाणात वर्दळ असून खड्डे बुजविण्याकडे या विभागाचे दुर्लक्ष झाले आहे.याबाबत मुख्य रस्त्याची “गंभीर” परिस्थिती असताना या मतदारसंघाचे लोकप्रतिनिधीनी याकडे त्वरित लक्ष पुरविणे आवश्यक आहे,अशी मागणी करण्यात आली आहे.

अभिप्राय द्या..