माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती सिंधुदुर्ग युवक काँग्रेसच्या वतीने साजरी..
देवगड /-
देशाच्या माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांची जयंती जिल्हाभर विविध कार्यक्रमांनी साजरी होत आहे.
सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या संकल्पनेतून असलदे येथील स्वास्तिक फाउंडेशन द्विविजा वृद्धाश्रम येथे माजी पंतप्रधान स्व. इंदिरा गांधी यांच्या जयंतीचे औचित्य साधत वयोवृद्धांना बेडशीट व चटईचें वाटप
सिंधुदुर्ग जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर यांच्या हस्ते नुकतेच करण्यात आले.
यावेळी जिल्हा युवक काँग्रेस कार्याध्यक्ष किरण टेंबुलकर, एन एस यु आय देवगड तालुकाध्यक्ष सुरज घाडी.किरण हळदणकर.रोहन घाडी.आदित्य आचरेकर.
राहुल घाडी.रितेश घाडी आदीसह कॉग्रेस कार्यकर्ते उपस्थित होते.