युवक काँग्रेसच्या वतीने येथील कुडाळ-पणदूर येथिल आनंद अनाथ आश्रमात नागरिकांना धान्य,खाऊचे वाटप..

युवक काँग्रेसच्या वतीने येथील कुडाळ-पणदूर येथिल आनंद अनाथ आश्रमात नागरिकांना धान्य,खाऊचे वाटप..

कुडाळ /-

युवक काँग्रेस कुडाळ मालवण विधानसभा अध्यक्ष मंदार शिरसाट यांच्या वतीने आज धाडसी नेतृत्व भारताच्या माजी पंतप्रधान आयर्न लेडी स्व. इंदिरा जी गांधी यांच्या जयंती निमित्त कुडाळ अणाव येथील आनंद अनाथआश्रम मधील जेष्ठ नागरिकांना धान्य, खाऊ व स्वच्छता राखण्यासाठी फिनेल व मास्क वाटप करण्यात आले.

सदर कार्यक्रम जिल्हा काँग्रेसचे सचिव महेश ऊर्फ बाळू अंधारी यांच्या मार्गदर्शनाखाली युवक काँग्रेसचे सिंधुदुर्ग जिल्हाप्रभारी शंभूराजे देसाई यांच्या उपस्थितीत करण्यात आला,यावेळी जिल्हा बँक संचालक विद्याप्रसाद बांदेकर, देवानंद लुडबे, कार्याध्यक्ष सिद्धेशभाई परब, जिल्हा युवक प्रवक्ता अरविंद मोंडकर, कुडाळ विधानसभा युवक अध्यक्ष मंदार चंद्रकांत शिरसाट, उपाध्यक्षा पल्लवी तारी, कुडाळ युवक अध्यक्ष महेश म्हाडदळकर, शहराध्यक्ष चिन्मय बांदेकर, वैभव आजगावकर, रोहन काणेकर, सावंतवाडी शहराध्यक्ष साद शेख, मालवण शहर अध्यक्ष गणेश पाडगावकर, आदींसह जिल्ह्यातील युवक काँग्रेसचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.यावेळी इंदिराजींच्या जीवन व कार्यशैली यावर पल्लवी तारी यांद्वारे कथन करण्यात आले.

अभिप्राय द्या..