कुडाळ /-

गेले 8 महिने कोरोना कालावधीत सिंधुदुर्ग जिल्ह्यात आदर्शवत काम करणाऱ्या पणदूर सरपंच दादा साईल आणि ग्रामपंचायती विरोधात नुकत्याच गावात आलेल्या चाकरमान्याने विनाकारण खोटे आरोप करून मानहानीकारक आणि बदनामी करणारा मेसेज तयार करून सोशल मीडियावर टाकला होता. या विरोधात सरपंच दादा साईल यांनी कुडाळ पोलीस स्टेशनला रीतसर फिर्याद दाखल केली होती. परंतु कुडाळ पोलीस निरीक्षक राजकीय दाबाखाली गुन्हा दाखल करायला आणि चौकशी करायला टाळाटाळ करत होते.

त्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या जिल्ह्यातील सर्वच प्रमुख पदाधिकाऱ्यांनी आज कुडाळ पोलीस स्टेशनला धडक देत सरपंचांनि दिलेल्या तक्रारी बाबत जाब विचारला.यावेळी उपस्थित जिल्हा पोलीस उपअधीक्षक डॉ. रोहिणी सोळुंखे यांनी याबाबत आपण जातीने लक्ष घालून सदर प्रकाराबाबत संबंधिताचा गुन्ह्यात वापरलेला मोबाईल जप्त करून सखोल चौकशी करण्याचे आदेश पोलीस निरीक्षक शंकर कोरे यांना दिले.
यावेळी जिल्हाअध्यक्ष राजन तेली, जेष्ठ नेते राजू राऊळ, जिल्हा सेक्रेटरी बाळू देसाई, उपाध्यक्ष रणजित देसाई, महिला जिल्हाध्यक्ष संध्या तेरसे, ओबीसी जिल्हाध्यक्ष दीपक नारकर, युवा मोर्चा अध्यक्ष भाई सावंत, सोशल मीडिया जिल्हाध्यक्ष अविनाश पराडकर, जिल्हा परिषद अध्यक्ष समिधा नाईक,भाजपा महिला मोर्चा सरचिटणीस सौ रेखा काणेकर जिल्हा चिटणीस बंड्या सावंत, अस्मिता बांदेकर, मोहन सावंत, ऍड. बंड्या मांडकूलकर, संजय वेंगुर्लेकर, किशोर मर्गज, अभय परब कुडाळ सभापती नूतन आईर, नगराध्यक्ष ओंकार तेली, ओरोस मंडळ अध्यक्ष गोपाळ हरमलकर, युवा मोर्चा अध्यक्ष पप्या तवटे, महिला तालुका अध्यक्ष आरती पाटील, मालवण तालुका अध्यक्ष धोंडी चिंदरकर, युवामोर्चा जिल्हा संघटनक संदीप मेस्त्री, उपाध्यक्ष राजा धुरी, राजेश पडते, विनायक अणावकर, पं.स. सदस्य संदेश नाईक, स्वप्ना वारंग, सुप्रिया वालावलकर, नगरसेवक आश्विन गावडे, सुनिल बांदेकर, राकेश कांदे इत्यादी जिल्ह्यातील आणि कुडाळ तालुक्यातील बहुसंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page