पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम येत तन्वी सातार्डेकर चे उज्ज्वल यश..

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम येत तन्वी सातार्डेकर चे उज्ज्वल यश..

दोडामार्ग /-

पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दोडामार्ग तालुक्यात प्रथम येत तन्वी सातार्डेकरने प्राप्त केले उज्ज्वल यश*
सन 2019-20 या शैक्षणिक वर्षात महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद,पुणे मार्फत घेण्यात आलेल्या पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा ( इयत्ता 8वी)च्या शिष्यवृत्ती परीक्षेत कु.तन्वी संतोष सातार्डेकर हिने घवघवीत यश संपादन केले आहे. कु.तन्वी हिने दोडामार्ग तालुक्यात प्रथम येण्याचा बहुमान प्राप्त केला आहे. त्याचबरोबर राष्ट्रीय ग्रामीण गुणवत्ता यादीत तिने दहावा क्रमांक पटकावला आहे.
कु.तन्वी सातार्डेकर ही कीर्ति विद्यालय घोटगेवाडी या प्रशालेत शिक्षण घेत आहे.यावर्षी शिष्यवृत्ती परीक्षेमध्ये हे यश मिळवून तिने यशाची परंपरा कायम राखली आहे.सन 2018-19 या शैक्षणिक वर्षामध्ये जिल्हा परिषदेमार्फत घेण्यात आलेल्या डाँ.ए.पी.जे.अब्दूल कलाम शिष्यवृत्ती परीक्षेत असे उत्तुंग यश मिळवून विमान प्रवासाने इस्रोची सफर केली होती.आतापर्यंत अनेक स्पर्धा-परीक्षा व स्पर्धांमध्ये तिने आपली चुणूक दाखवली आहे.तिच्या या यशातील सातत्याचे श्रेय ती आपल्या मार्गदर्शक शिक्षकांना व आई-वडिलांना देते.तिच्या या यशाबद्दल विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री.कांबळे सर,शिक्षक श्री.देसाई सर व मेथे सर यांनी तिचे कौतुक केले आहे. त्याचबरोबर पालकवर्ग,ग्रामस्थ,संस्थाप्रमुख श्री.मोहन वसंतराव शिरोडकर व संस्थेच्या सर्व सभासदांनी तिचे विशेष कौतुक केले आहे.

अभिप्राय द्या..