पावसामुळे मठ गावात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान.;

पावसामुळे मठ गावात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान.;

वेंगुर्ला/
वेंगुर्ला तालुक्यात काल सायंकाळी विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला.यामध्ये तालुक्यातील मठ गावात सुमारे ५० हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.सोमवारी तालुक्यात ६१ मिमी एवढा पाऊस पडला आहे.गेले ४ दिवस उष्णतेत प्रचंड वाढ झाली होती.गणपती उत्सव कालावधीत कमी – अधिक प्रमाणात पाऊस झाल्यावर रविवारी सायंकाळी ७ वा. नंतर विजेच्या कडकडटासह जोरदार पाऊस झाला.यामध्ये मठ सतयेवाडी येथील दिवाकर वसंत गावडे यांच्या घराच्या पडवीवर घरानजीकची घळण कोसळून सुमारे ३५ हजार रुपयांचे नुकसान झाले आहे.याबाबत आज सकाळी त्वरित मठ उपसरपंच निलेश नाईक,तलाठी गवते,कोतवाल सुरेश मठकर यांनी पाहणी केली व पंचयादी केली आहे.तसेच मठ बोवलेकरवाडी येथील मोडकेपूल नजीक अनंत श्रीधर बागायतकर यांच्या बागायती येथील कठडा कोसळून नुकसान झाले आहे.तसेच मठकरवाडी येथील मंदिराशेजारील कठडा कोसळून नुकसान झाले आहे.

अभिप्राय द्या..