अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित युवकावर तात्काळ गुन्हा दाखल करा.;कुडाळ मनसे आक्रमक..

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या संबंधित युवकावर तात्काळ गुन्हा दाखल करा.;कुडाळ मनसे आक्रमक..

पैशासाठी हपापलेल्या त्या असंवेदनशील पोलीस कर्मचाऱ्यांची चौकशी करून तात्काळ कारवाई करावी मनसेची आग्रही मागणी..

कुडाळ /-

कुडाळ मुंबई गोवा महामार्गावरील झाराप ते तेर्सेबांबर्डे परीसरा नजीकच्या एका गावात अकरा वर्षीय मुलीवर लैगिक अत्याचार करून अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न झाल्याचा प्रकार उघड झाला आहे.तअसलेल्या एका परप्रांतीय लाकूड व्यावसायिकाच्या मुलाने त्याचेकडील मजुराच्या चौथीत शिकणाऱ्या मुलीला विवस्त्र करून मुलीचे ओट चावून जबरदस्ती करण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार गुरुवार दि 12 नोव्हेंबर 2020 रोजी घडला..दरम्यान संबंधित अत्याचारित मुलीच्या आईवडिलांनी कुडाळ पोलिस ठाण्यात धाव घेतली व न्यायासाठी भिक मागितली मात्र संबंधित असंवेदनशील पोलिस कर्मचाऱ्याने पैशाच्या हव्यासापोटी मुलीच्या वडिलांकडून साधी तक्रार लिहून घेत कालांतराने ती आर्थिक देवाण-घेवाण पूर्ण झाल्याने मुलीच्या वडिलांकडून काढून घेतल्याचा प्रकार कुडाळ पोलिस ठाण्यात घडल्याचा आरोप मनसेच्या शिष्टमंडळाने केला सदरील प्रकरणात परप्रांतीय लाकूड व्यावसायिकाच्या मुलाला जिल्हा बाहेर फरार करून प्रकरण दाबून त्याला वाचवण्याचा प्रयत्न कुडाळ पोलीस ठाण्यातील काही भ्रष्ट कर्मचारी करीत असल्याचा आरोप कुडा मनसेच्या शिष्टमंडळाने कुडाळ पोलीस निरीक्षक श्री कोरे यांची भेट घेऊन केला संबंधित प्रकरणावर गांभीर्यपूर्वक लक्ष वेधत तात्काळ पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याचे मान्य करून गुन्हा नोंदीच्या कारवाईस वरिष्ठांच्या आदेशानुसार कार्यवाही चालू केली.यावेळी मनसेच्या शिष्टमंडळाने व कुडाळ शिवप्रेमी ग्रुपच्या सदस्यांनी पैशासाठी हव्यासलेल्या त्या पोलिस कर्मचाऱ्यांची विभागीय चौकशी करून कठोर कारवाई करण्यासंबंधी पोलीस अधीक्षकांची भेट घेण्याचा निर्धार केला. अलीकडील कुडाळ पोलिस स्थानकात अशाप्रकारे अनेक प्रकरणे अर्थपूर्ण साटेलोटे यातून दाबली जात असून काही भ्रष्ट कर्मचारी यात गुंतले आहेत असा धडक आरोप मनसेच्या कार्यकर्त्यांनी केला अवैध दारू गुटका चरस गांजा आणि अशाप्रकारे लैंगिक अत्याचार अशा प्रकरणातून जिल्ह्यातील कायदा-सुव्यवस्था ही बिहारच्या धर्तीवर नेण्याचा प्रयत्न चक्क पुण्यामधील पोलिसांकडूनच होत असल्याने मनसेने तीव्र शब्दात निषेध व्यक्त केला व सदर प्रकरणात संबंधित संशयित युवकास येत्या दोन दिवसात अटक न झाल्यास मनसे पोलीस कार्यालयासमोर धरणे आंदोलन करील असा सज्जड इशारा दिला.

यावेळी मनसेचे कुडाळ तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे यांचे नेतृत्वाखालील शिष्टमंडळात मनविसे जिल्हाध्यक्ष कुणाल किन्हाळकर तालुकाध्यक्ष दीपक गावडे कुडाळ शहर सचिव रमाकांत नाईक विभाग अध्यक्ष सुंदर गावडे तर शिवप्रेमी ग्रुपचे स्वरूप वाळके,अक्षय कुंभार,किरण कुडाळकर,प्रथमेश धुरी आदि कार्यकर्ते उपस्थित होते.उशिरा मिळालेल्या माहितीनुसार संबंधित युवकावर पॉस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू करण्यात आलेली असल्याचे कळते.

अभिप्राय द्या..