कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

कणकवली शिवसेना शाखेत बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी साजरी

कणकवली /-

कणकवली तालुका शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आज साजरी करण्यात आली.यावेळी कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी उपस्थित राहून बाळासाहेबांच्या प्रतिमेस आदरांजली वाहिली. बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला.अमर रहे..! अमर रहे …! बाळासाहेब ठाकरे अमर रहे!, हिंदूहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो अशा घोषणा याप्रसंगी शिवसैनिकांनी दिल्या.

याप्रसंगी जिल्हाबँक अध्यक्ष सतीश सावंत, शिवसेना नेते संदेश पारकर ,तालुकाप्रमुख शैलेश भोगले,प्रथमेश सावंत,सचिन सावंत,जिल्हा महिला संघटक निलम पालव,राजु राणे, कन्हैया पारकर,अँड.हर्षद गावडे, राजु राठोड,संदेश पटेल, वैदेही गुडेकर, अनुप वारंग, निसार शेख,ललित घाडीगांवकर, विलास गुडेकर, महेश कोदे, बाबु रावराणे, पराग म्हापसेकर, आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..