काँग्रेसच्यावतीने स्व. पंडित नेहरू याची जयंती साजरी

काँग्रेसच्यावतीने स्व. पंडित नेहरू याची जयंती साजरी

मालवण / –

तालुका राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने भारताचे पहिले पंतप्रधान स्व. पंडित जवाहरलाल नेहरू याची जयंती तसेच बाल दिन येथील कन्या शाळेच्या सभागृहात साजरा करण्यात आला.
प्रदेश सदस्य तथा माजी जिल्हाध्यक्ष साईनाथ चव्हाण यांच्या हस्ते पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वातंत्र्योत्तर काळात राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या अहिंसावादी, स्वातंत्रीय राष्ट्रप्रेमाने प्रेरित झाल्याने पंडित जवाहरलाल नेहरू यांनी आपले सर्वस्वच देवसेवेला अर्पण करत भारत देशाला ब्रिटीश साम्राज्यवाद्याच्या मगरमिठीतून स्वातंत्र्य मिळवून देण्यासाठी दैदीप्यमान कामगिरी केली आहे. शिवाय लहान मुलांविषयी अतोनात प्रेमभावना त्याच्यात होती आणि ती शेवटपर्यंत त्यांनी जपलेली होती आणि म्हणुनच त्यांच्याच जयंती दिवशीच बालदिवस साजरा करण्यात येतो.असे साईनाथ चव्हाण यांनी सांगितले. पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पंतप्रधान कालखंडाच्या कार्याचाही त्यांनी गौरव केला.
यावेळी तालुकाध्यक्ष मेघनाथ धुरी, उपाध्यक्ष हेमंत माळकर, सेक्रेटरी महेंद्र मांजरेकर, जेम्स फर्नांडिस, संदेश कोयंडे, उदय लुडबे, मधुकर लुडबे, श्रेयस माणगावकर, हेमंत कांदळकर, संजय धुरी, कृष्णा गावडे, बाबा मेंडिस, राम धनावडे, सागर चव्हाण, श्रीहरी खानविलकर यांच्यासह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते. प्रास्ताविक श्री. धुरी यांनी केले. महेंद्र मांजरेकर यांनी आभार मानले.

अभिप्राय द्या..