वेंगुर्ला /-
तालुक्यातील दाभोली ग्रामपंचायत उपसरपंचपदी दाभोली विकास आघाडीचे श्रीकृष्ण बांदवलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
तत्कालीन उपसरपंच संदीप पाटील सलग चार महिने ग्रामपंचायतीच्या पूर्व परवानगीशिवाय गावात व ग्रामपंचायतीमध्ये दिसून आले नसल्याने तसेच त्यांनी याबाबत केलेला खुलासाही सुसंगत व संयुक्तिक नसल्याने त्यांचे उपसरपंच पद रद्द करण्यात आले होते. दरम्यान या रिक्त पदासाठी उपसरपंच निवड प्रक्रिया घेण्यात आली. यात श्रीकृष्ण बांदवलकर यांची बिनविरोध निवड करण्यात आली. यावेळी सरपंच उदय गोवेकर, सदस्य जेनिफर डीसोजा, सुवर्णा मांजरेकर, समिधा बांदवलकर, ग्रामसेवक चेतन अंधारी, पोलिस पाटील जनार्दन पेडणेकर आदींनी या निवड प्रक्रियेत सहभाग घेतला होता.
या निवडीच्यावेळी जॉन उर्फ बाबा मेंदोंन्सा, नरेश बोवलेकर, एकनाथ राऊळ, माजी प.स.सदस्य समाधान बांदवलकर, तामय डीसोजा, सुर्या सागवेकर, विवेक परब, दादा सारंग, गुरुनाथ कानजी, महेश हळदकर, संतोष पडवळ, दाजी मयेकर, अनिल मोरजे आदी उपस्थित होते.