वेंगुर्लेच्या सुपुत्राची गोव्यात पदवी परीक्षेत बाजी..

वेंगुर्लेच्या सुपुत्राची गोव्यात पदवी परीक्षेत बाजी..

वेंगुर्ला /-

वेंगुर्ले देऊळवाडा सातेरी मंदिर येथील राजेश सुरेश परब हे गोवा विद्यापिठातून फार्मसी विषयांत पी.एच.डी.ची परीक्षा प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झालेले आहेत. ते गोवा राज्यातून फार्मसी विषयात अशी पदवी प्रथम क्रमांकाने मिळविणारे एकमेव विद्यार्थी ठरले आहेत.
त्यांना गोवा कॉलेज ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. गोपाळ कृष्णा राव यांचे मार्गदर्शन लाभले. त्यांना मानपत्र व पदवी प्रदान करण्यातं आली.
त्यांच्या या अपूर्व यशाबद्दल वेंगुर्ले तालुक्यासह जिल्ह्यातील शैक्षणिक क्षेत्रातून त्यांचे अभिनंदन होत आहे.

अभिप्राय द्या..