अखेर शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने श्रमदान करून बुजविण्यात आले रस्त्यावरील खड्डे!

अखेर शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने श्रमदान करून बुजविण्यात आले रस्त्यावरील खड्डे!

कुडाळ /-

शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने पोलिस स्टेशन ते हायवे या रस्त्यावरील खड्ड्यांची श्रमदानातून डागडुजी करण्यात आली. खडीकरण होऊन सात ते आठ महिने झाले, परंतु अजूनही या रस्त्याचे डांबरीकरण झालेले नाही. आता तांत्रीक कारण पुढे करत हा रस्ता रखडला आहे. कुडाळ शहरात येणारा हा मुख्य रस्ता आहे. या रस्त्यावरुन दररोज हजारो प्रवासी प्रवास करतात. शहरात उपचारासाठी येणारे रुग्ण, वयोवृद्ध नागरीक तसेच वाहनचालकांना नाहक या खडड्यांचा त्रास सहन करत राहावा लागत आहे. काही ठिकाणी खड्डे एवढे मोठे आहेत की कोणत्याही क्षणी अपघात होण्याची दाट शक्यता आहे. अशावेळी अपघातात कुणाचा नाहक बळी गेल्यास त्यास जबाबदार कोण असणार? त्यामुळे प्रशासनाची वाट न पाहता शिवप्रेमी सिंधुदुर्गच्यावतीने आज श्रमदानातून रस्त्यावरील खड्डे बुजविण्यात आले.

आता लोकांनीच पुढाकार घ्यावा!
वाहतुकीसाठी चांगले रस्ते हा जनतेचा मूलभूत हक्क आहे. परंतु प्रशासन आणि नेते एकमेकांवर जबाबदारी ढकलत आहे. अशावेळी लोकांनी पुढे येऊन जाब विचारणे आवश्यक आहे. आज लोक फक्त चर्चा करतात, बघ्याची भूमिका घेतात म्हणून प्रशासन व नेते मंडळींचे फावते. त्यामुळे रस्त्यावरील खड्ड्यांच्या समस्येसंदर्भात लोकांनी पुढे येण अपेक्षित आहे. आजची ही एक सुरुवात आहे. असे प्रतिपादन शिवप्रेमी सिंधुदुर्ग संघटनेच्यावतीने करण्यात आले.

यावेळी चंदन कांबळी, अक्षय जोशी, गोट्या कोरगावकर, नागेश नार्वेकर, सर्वेश पावसकर, राज भेंडे, किरण कुडाळकर, दिनेश साळुंखे, ओंकार वाळके, रमाकांत नाईक, दैवेश रेडकर, नंदराज पावसकर आदी शिवप्रेमी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..