कणकवली /-

कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकाऱ्यांची मासिक बैठक कणकवली विजय भवन येथे आज संपन्न झाली. यावेळी शिवसेना नेते संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव, युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू यांनी मार्गदर्शन केले. युवासेना संघटनात्मक बांधणी संदर्भात यावेळी चर्चा करण्यात आली.घर तेथे युवासैनिक निर्माण करण्याचे काम युवासेनेने हाती घेतले आहे. याबाबत गीतेश कडू यांनी बैठकीत माहिती दिली
केंद्र शासन व महाराष्ट्र शासन यांच्या माध्यमातून सुरु असलेल्या प्रधानमंत्री मस्त्य संपदा योजनेचा लाभ सर्वांनी घ्यावा. तसेच युवासेनेची सिंधुदुर्ग जिल्हयात वेगळी ताकद निर्माण करावी . महाविकास आघाडी सरकार मार्फत झालेली विकासकामे लोकांपर्यंत पोहोचवा.असे आवाहन शिवसेना नेते संदेश पारकर, महिला जिल्हाप्रमुख नीलम पालव यांनी केले

जि. प. पं. स. ग्रा. प. नगरपंचायत च्या होणाऱ्या निवडुकांमध्ये खासदार विनायक राऊत, पालकमंत्री उदय सामंत,आमदार वैभव नाईक, जिल्हाप्रमुख संजय पडते, शिवसेना नेते सतीश सावंत, संदेश पारकर, अतुल रावराणे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेचा भगवा फडकविण्यासाठी सज्ज व्हा तसेच जास्तीत जास्त युवसेनेच्या कार्यकर्त्यांची नोंदणी करा असे गीतेश कडू यांनी सांगितले.
याप्रसंगी युवासेना जिल्हाप्रमुख गीतेश कडू यांच्या वतीने कणकवली देवगड वैभववाडी विधानसभा मतदारसंघातील युवासेना पदाधिकाऱ्यांना भेटवस्तू उटणे पॅकेटचे वाटप करण्यात आले. प्रतीक रासम यांची कणकवली युवासेना उप शहरप्रमुख पदी नियुक्ती करण्यात आली.
यावेळी युवासेना जिल्हा समन्वयक राजू राठोड, जिल्हा चिटणीस स्वप्नील धुरी, कणकवली तालुकाप्रमुख ललित घाडीगावकर, वैभववाडी तालुकाप्रमुख अतुल सरवटे, देवगड तालुकाप्रमुख निनाद देशपांडे,व अमेय जठार, तेजस राणे,सचिन पवार जयराज हरयाण, आबू मेस्त्री,अवधूत तारी,कैलास घाडीगावकर, सुशांत मोहिते, रोहित राणे, उमेश गुरव, प्रकाश वाघेरकर, प्रकाश मेस्त्री, चैतन्य सावंत, संतोष सावंत, प्रमीनल नलावडे, धनंजय सावंत, भूषण कळसुळकर आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

You cannot copy content of this page