कुडाळ /-
राष्ट्रवादी काँग्रेस प्रदेश सचिव पदी काका कुडाळकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे.ही निवड पाटील यांनी संघटना वाढविण्याच्या दृष्टीने कुडाळकर यांची निवड केली आहे.प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या दौऱ्यानिमित्त ही निवड जाहीर करण्यात आली.श्री.कुडाळकर हे गेली अनेक वर्षे राजकारण व समाजकारणात आहेत.यापूर्ी त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून चांगले काम केले होते.त्यानंतर शिवसेनेत मात्र सलमान पक्षात आणि काँग्रेसमध्ये त्यांनी आपली भूमिका योग्य पद्धतीने ठेवली होती,मात्र नुकताच काँग्रेसमधून त्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला होता.त्यांच्या मागे तरुण कार्यकर्त्यांची मोठी फळी आहे. पक्षसंघटना वाढीच्या दृष्टीने त्यांचा फायदा राष्ट्रवादीला व्हावा म्हणून त्यांच्याकडे प्रदेशची जबाबदारी देण्यात आलेली आहे.त्यांच्या नियुक्तीचे पत्र जलसंपदामंत्री तथा राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या हस्ते देण्यात आले. यावेळी जिल्हाध्यक्ष अमित सामंत, माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले प्रफुल्ल सुद्रिक आदी उपस्थित होते.