पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणात ६५ जणांचा सहभाग..

पोलीस भरती पूर्व प्रशिक्षणात ६५ जणांचा सहभाग..

वेंगुर्ला /-

माजी विद्यार्थी संघ न्यू इंग्लिश स्कूल, उभादांडा आणि वेंगुर्ला तालुका क्रीडा प्रशिक्षण केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच लायन्स क्लबचे प्रदीप वेंगुर्लेकर यांच्या पुढाकाराने कॅम्प स्टेडियमवर सुरु असलेल्या पोलिस भरती पूर्व प्रशिक्षण वर्गात एकूण ६५ जणांनी सहभाग घेतला.प्रशिक्षणात डॉ. प्रफुल्ल आंबेरकर आणि डॉ. प्रल्हाद मणचेकर यांनी सहभागी झालेल्या सर्व प्रशिक्षणार्थींना मैदानी सरावादरम्यान घ्यावयाची काळजी, तंदुरुस्ती वाढवण्या बरोबराच दुखापती टाळणे, सरावाच्या योग्य पद्धती आणि बारकावे याबाबत मार्गदर्शन केले. माजी विद्यार्थी संघटनेतर्फे नगरसेवक विधाता सावंत यांच्या हस्ते सदरच्या प्रशिक्षण वर्गाला क्रीडासाहित्य प्रदान करण्यात आले. या मार्गदर्शन वर्गाकरीता रांगणा रनर्स या ग्रुपचे विशेष सहकार्य लाभले. यावेळी नगराध्यक्ष दिलीप गिरप, डॉ.राजेश्वर उबाळे, प्रशिक्षण वर्गाचे मुख्य क्रीडा प्रशिक्षक आणि मार्गदर्शक जयराम वायंगणकर, जयवंत चुडनाईक, संजीवनी परब, अशोक ठोंबरे, नंदन वेंगुर्लेकर, निधी शिरोडकर आदी उपस्थित होते.

अभिप्राय द्या..