साटेली ग्रामपंचायत सदस्य मनीषा जाधव यांचा शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा..

साटेली ग्रामपंचायत सदस्य मनीषा जाधव यांचा शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा..

सावंतवाडी /-

साटेली ग्रामपंचायत सदस्य मनिषा मनोहर जाधव यांनी शिवसेना सदस्य पदाचा राजीनामा शिवसेना तालुकाध्यक्ष रूपेश राऊळ यांच्याकडे अर्जाद्वारे दिला आहे.या अर्जात म्हणाल्या की,सार्वत्रिक ग्रामपंचायत निवडणूक साटेली ग्रामपंचायत सदस्य म्हणून मागासवर्गीय आरक्षणातून निवडून आल्या असून सदस्य म्हणून ग्रामपंचायत साटेलीमध्ये कार्यरत आहेत.

दरम्यानच्या काळात साटेली ग्रामपंचायत मागास आरक्षणातून निवडून आलेले थेट सरपंच केशव शंकर जाधव व मनिषा मनोहर जाधव व इतर काही ग्रामपंचायत सदस्य मिळून शिवसेना पुरस्कृत ग्रामपंचायत बॉडी बसविण्यात आली. त्यावेळी पासून मी आपल्या शिवसेना पक्षाची सभासद म्हणून नवीन ओळख मला मिळाली. परंतु कोविड-१९ च्या संदर्भात माझ्या कुटुंबावर शिवसेनापुरस्कृत सरपंच असताना व मी शिवसेना पक्षाची सभासद असताना माझ्या कुटुंबावर जातीय झालेला छळ या कृत्याला अनुसरून आपल्यासह शिवसेनेच्या सरपंचांपासून इतर एकाही नेत्याने या प्रकणाची विचारपूस केली नसून कोणीही धीर दिला नाही. त्यामुळे माझ्या कुटुंबात अंतर्गत वाद निर्माण झाले आहेत. शिवसेना सारख्या मोठ्या पक्षाच्या सावलीत असूनसुद्धा आमच्या कुटुंबात झालेल्या जातीय अत्याचार निवारण करण्यात आले नाही, ही खेदाची बाब आहे, म्हणून आपण शिवसेना सभासद पदाचा राजीनामा देत असल्याचे मनिषा जाधव यांनी म्हटले आहे.

अभिप्राय द्या..