कोल्हापूर /-
जगावरती अतिभयंकर आलेल्या कोरोना संकटाच्या काळामध्ये केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल कोल्हापूर जिल्हयातील पन्हाळा तालुक्यामधील कोतोली, पडळ, कळे येथील ५६ गावातील आशा वर्कर्स, जिल्ह्यातील उत्कृष्ट सामाजीक कार्य केलेले संपादक, समाजसेवक, पत्रकार, उदयोजक, सरपंच यांना सोशल सर्कल मल्टीपरपज सोसायटीच्या वतीने कोविड योध्दा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले .कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री सहाय्यक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले होते तसेच स्मिता लंगडे उद्योजिका व सामाजिक कार्यकर्त्या, श्री डी एम पाटील उपनिरीक्षक केडीसी बँक खुपिरे, श्री दत्ता पाटील डायरेक्टर विश्वास ट्रेडर्स, श्री अजित देसाई चेअरमन दक्षिण महाराष्ट्र कोर कमिटी, डॉ चारूदत्त रणदिवे इत्यादी कार्यक्रमास प्रमुख पाहुणे उपस्थित होते तसेच श्री हिंदुराव पाटील चेअरमन को.जि.मा.शि शाखा मुरगूड .,श्री अशोक पाटील सामाजिक कार्यकर्ते , श्री सचिन जोशी अध्यक्ष श्री शारदा शिक्षण संस्था,सौ विद्या चव्हाण उपसरपंच, श्री उत्तमराव कागले संपादक दैनिक हिंदू सम्राट , श्री संग्रामसिंह देसाई ,सदस्य पंचायत समिती मुरगुड, श्री अमित काकडे पत्रकार व अभिनेते ,श्री धनाजी शेवाळे सामाजिक कार्यकर्ते,श्री अब्दुल मिरशिकारी चेअरमन इंडो बेकरी,प्रा. तुकाराम पाटील पत्रकार व सामाजिक कार्यकर्ते, श्री महमदयासिन शेख राष्ट्रीय सहसचिव मानव अधिकार सुरक्षा संघ यांची कार्यक्रमात प्रमुख उपस्थिती होते.
कोरोना कालावधीत समाजातील वेगवेगळ्या क्षेत्रात आपले सामाजिक सेवा कार्य करणारे किरण गवळी, अनंत शांती संस्थेचे अध्यक्ष भगवान गुरव,प्रमोद पाटील, सरपंच सौ. शुभांगी परीट,श्री उत्तम कांबळे, संदिप बोटे, संजय शिंदे, हिदायत नायकवडी, संदिप कांबळे मानवता फांउडेशन,सह्याद्रीचे संपादक नितीन बोटे, सरपंच-सौ माधुरी भोसले,पत्रकार डॉ राजेन्द्र सूर्यवंशी,महादेव वाघमोडे , प्रा तुकाराम पाटील- समाजसेवक ,पत्रकार अजित कांबळे, उदय सूर्यवंशी, सूर्यकांत चांदणे, गोरख कांबळे,संजय पाटील पत्रकार , संजय पाटील समाजसेवक,धनजंय चवई युवा उद्योजक,सौ प्रमोदिनी माने,अशोक पाटील- समाजसेवक अमित काकडे- पत्रकार,सौ मनिषा पाटील- उद्योजिका,श्री धनाजी शेवाळे,श्री.अमित मोहितेश्री.अमोल पुजारी, श्री.सचिन जोशी- संस्थापक श्री जाफर सयद,अमित मोहीते, सुरज सांगावकर,सुरेश राठोड, उपसंपादक दै . जनमत वसुमती देसाई, पत्रकार जनमत सुरज सांगावकर, शंशाक प्रिस्टे, विजय जाधव यांना कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व सोशल सर्कल मल्टीपर्पजच्या वतीने अध्यक्षा सौ.सुमित्रा फराकटे,सौ.रोहिणी भोसले सचिवा,सौ.प्राजक्ता चव्हाण ,सुभाष भोसले उपाध्यक्ष श्री.संतोष चव्हाण सहसचिव,प्रशांत भोसले सहसचिव, यांचे हस्ते कोविड योध्दा पुरस्कारांने सन्मानित करण्यात आले .
अध्यक्षा सौ सुमित्रा फराकटे यांनी मनोगतातून सोशल सर्कल मल्टीपरपज सोसायटीच्या सामाजिक कार्याच्या उल्लेखनीय कामगिरीचा थोडक्यात आढावा मांडला या कार्यक्रमासाठी सत्यर्थ इंटरप्राईजेस व विश्वास ट्रेडर्स यांचे विशेष सहकार्य लाभले. तसेच कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सौ. प्राजक्ता चव्हाण , स्वागत व प्रास्ताविक सुभाष भोसले , कार्यक्रमाचे आभार प्रशांत भोसले यांनी मानले.